2008 - 09 चा काळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. प्रत्येक घटना मनाविरुद्ध घडत होती. परिस्थीती सुधारण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, घेतलेला प्रत्येक निर्णय परिस्थीती आनखीनच बिघडवत जात होता. हतबलता म्हणजे काय हे मी तेव्हा अनुभवल. आयुष्यात असे काही patches येतात जिथे कोसळनारा पत्यांचा बंगला पाहत बसण्यापलिकडे आपण काहीच करू नाही शकत. हे सगळ कमी की काय म्हणून recession नावाच वादळ professional life ला येवून थडकल होत. ती सगळी अस्थिरता मला असह्य झाली. माझा एक जिवलग मित्र आहे.. त्याने मला एक सल्ला दिला.. Take a Break..त्या साल्याचे सल्ले दर वेळी मला मदत करून जातात.. म्हणून ऑफिस मधून मी संपूर्ण आठवड्याची सुट्टी घेतली.. आणि माझ्या most favourite resort ला जायचा निर्णय घेतला... माझ्या घरी...
सकाळी 10 च्या दरम्यान स्वारगेटला पुणे - कोल्हापुर गाडी मध्ये जावून बसलो. गर्दीचा कंट़ाळा आला की आजूबाजुला सुद्धा माणस नकोशी वाटायला लागतात म्हणून मी मुद्दामून माझ्या बाजुच्या सीट वर माझी bag ठेवून डोळे मिटून पडलो.. "कुणी बसलय का इथे?" एक अनोळखी आवाज कानावर पडला.. पाहिल तर एक 65-70 दरम्यान वय असलेले आजोबा उभे होते.. मला थोड अपराधी वाटल... मी लगेच माझी bag उचलली आणि त्याना सॉरी म्हणालो.. ते "नाही नाही its ok" म्हणत माझ्या शेजारी बसले. "तुम्हाला सातारयाला जायच आहे का? ही बस सातारयामध्ये नाही जात" मी त्याना कदाचित माहीत नसेल ह्या शंकेने विचारल.. ते हसले आणि म्हणाले "नाही मला कोल्हापुरलाच जायच आहे".. बस सुरु झाली आणि सुरु झाला एक 'प्रवास'....
बराच वेळ शांततेत गेला.. अशी शांतता जिच्या शोधात मी पुणे सोडल होत.. पण मनात मला पडलेल्या प्रश्नांचा गोंगाट संपता संपत नव्हता.. एक प्रश्न आहे जो आपल्यातल्या बरयाच जनाना अगदी सहज खचवून जातो.. 'हे सगळ माझ्यात बाबतीत का घडतय?'..... ह्या प्रश्नांची उतरे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न करता करता मी पाहात होतो की ते आजोबा दर 10 -15 मिनिटानी पायातला बूट काढून पुन्हा घालत होते... मला वाटल की त्याना विचारव त्यामागच कारण पण माझ्या मनाने सगळ्याच क्षेत्रातून राजीनामा दिला होता त्यामुळॆ काही बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती..
"तू कोल्हापुरचा?" मी हसून हो म्हणालो.. "मग पुण्यात शिकतोस का?"... "नाही, माझ शिक्षण पूर्ण झालय, सध्या मी जॉब करतो.. software engineer आहे".... ते आजोबा भुवया उंचावुन मान डोलावत हसले... पण मला ती reaction नविन नव्हती म्हणून मी पण हसून दाद दिली... "कोल्हापुरात कुठे राहतोस?".. "नाही, मी proper कोल्हापुरचा नाहिये.. कोल्हापुर जिल्ह्यात एक छोट गाव आहे.. तिथला आहे.." हे ऐकून त्या आजोबांच्या चेहरयावरचे भाव अचानक बदलल्या सारखे वाटले.. बरेच दिवस शोधत असलेल काहीतरी सापडल की माणसाचा चेहरा जसा होतो तसा त्याचा चेहरा खुलला... "गाव?... म्हणजे शेती, जनावरे, बैलगाड्या, वडाच झाड....... हे सगळ असेल नई..." मी चेष्टेच्या उद्देशाने म्हणालो की "बैलगाड्यांच फ़क्त next version म्हणजे ट्रेक्टर आलेत पण बाकीच्यांच जुन version जसच्या तस आहे..." ते हसायला लागले..
"आजही तिथे वडाच्या झाडाखाली माणसांच्या गप्पा रंगतात का?" मी होकारार्थी मान डोलावत माझ्या गावचे काही मजेशीर किस्से त्याना ऐकवले... हे सगळ घडत असताना ते अजुनही पायातला बूट काढून पुन्हा पुन्हा घालत होते.. ते हसत हसत डोळ्यातल पाणी पुसत मला म्हणाले, "अजुनही कुठेतरी माणस आहेत हे समजल की बर वाटत.. नशीबवान आहेस तू.." ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला... गर्दीला कंट़ाळलेल्या एका प्रवाशाला माणूस शोधनारा दूसरा प्रवासी भेटला होता....
"अस का म्हणताय आजोबा?"...... त्यानी आपली कहानी सांगायला सुरुवात केली.. "मी पुण्यामध्ये नळ स्टॉप जवळ राहतो.. मोठा बंगला आहे माझा.." माझ्या व्यवहारी मनाने लगेच त्या बंगल्याची किंमत calculate केली... "1972 साली एकेक पैसा जमा करून मोठ्या कष्टाने उभा केल घर... मी पूर्वी मुंबईला सूत गिरनी मध्ये मोठ्या पदावर काम करत होतो.. पुण्यात घर बांधत असतानाच मुंबई मधल्या गिरन्या बंद पडल्या आणि माझ्या समोर मोठमोठी संकट उभी राहिली.. पण माझ्या पत्नीने त्या वेळेत खुप मोलाची साथ दिली मला.. ठामपणे उभी राहिली माझ्या पाठीशी.. आज आम्ही दोघेच राहतो त्या भल्या मोठ्या बंगल्यात... माझा मुलगा mechanical engineer आहे.. पण मध्यंतरी शेअर मार्केट मध्ये भरपूर फ़ायदा झाला म्हणून जॉब सोडून कसलीतरी शेअर मार्केट संबंधी business सुरु केलाय त्याने.. मला आणि माझ्या पत्नीला नाही पटल त्याच पैशा मागे धावन पण नाही ऐकले त्याने कुणाचे... कधीतरी येतो अधून मधून आठवण आलीच आमची तर भेटायला.. मुलगा माझा हरवलाय ह्या व्यवहारी जगात.. मुलगीच 6 वर्षा पूर्वी लग्न झाल.. मला एक नातू सुद्धा आहे.. पण तो थोडासा mentally weak आहे.. बरयाच treatment झाल्या पण काही उपयोग नाही झाला.. माझ्या काही लक्षातच राहत नाही ओ आजोबा, मी काय करू अस सारख म्हणत असतो.. " बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले.. काही दिवसां पूर्वी माझ्या पत्नी ला heart attack आला होता. कुणीच नव्हत जवळ.. देव बलवत्तर म्हणून वाचली.. दर 1 तासाने मला मिसकॉल द्यायला बजावलय मी तिला तेव्हापासून... माझ ही शरीर आता साथ नाही देत.. माझ्या पायाला दर 10 -15 मिनिटानी सूज येते.. म्हणून डॉक्टर नी दर थोड्या वेळाने शूस काढून थोड चोळायला सांगितलाय पाय... जीवन आनंदी असाव म्हणून आयुष्यभर झगड़लो पण आज जे हवय तेच नाहिये.. माणसं..."
मी सुन्न होवून ऐकत होतो.. "तुमच्या पिढीची गती पाहून बर वाटत.. पण ज़रा जपून पुढे जा.. आपली माणस सांभाळा... कारण जितकी गती जास्त तितकीच ठेच लागल्यानंतरची जखमही मोठी.." कोल्हापुर कधी आल समजल ही नाही.. त्याना मन मोकळ झाल्या सारख वाटत होत.. गाडी थांबली.. त्यानी मला त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि कधीतरी घरी ये म्हणाले.. ते निघाले इतक्यात मी त्याना हाक मारली.. त्यांच्या जवळ जावून त्यांच्या पायाना स्पर्श केला.. त्याना गहिवरून आल होत.. माझ्या डोक्यावर हात ठेउन काहीही न बोलता ते निघून गेले.. त्यानंतर माझे प्रश्न सहज सुटले असही नाही किंवा नंतर आयुष्यात प्रश्न पडलेच नाहीत अस सुद्धा नाही.. पण त्या आजोबानी दिलेल्या आशीर्वादामुळॆ लढायच बळ नक्कीच मिळाल... परिस्थितिकड़े पहायचा माझा दृष्टिकोण बदलला.... अशा घटनामुळॆ कुणीतरी सांगीतलय ते बरयाचदा पटत.... जो होता है, अच्छे के लिए होता है.....
जो होता है, अच्छे के लिए होता है.....
ReplyDeletevery true....
very nice 1!
ReplyDeleteGood Yaar, Nice one, Learned few things, and also got an answer to the dicision I was taking today!
ReplyDeletenice one and very emotional.
ReplyDelete