परवाचा दिवस. as usual... nothing new.. तसही सॉफ्टवेअर इंजीनीअरच्या आयुष्यात नवनवीन bugs सोडले तर नवीन अस जास्त काही घडत नाही. असो.. thats a different story. ऑफिस मधली कामे आटपून घरी पळायच्या तयारीने computer shut down केला. सगळे कृत्रिम tata, bye bye, see u tomorrow संपवून एकदास त्या AC वाळवंटातुन बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी गार वारयाची एक झुळूक स्पर्ष करून गेली. गेले २-३ दिवस असच होत होत. त्याची फ़क्त चाहुल लागत होती.. पण त्याचा साक्षात्कार काही होत नव्हता. म्हणून मी त्याचा जास्त विचार न करता बस मध्ये जावून बसलो. Headphones वर गाणी ऐकता ऐकता कधी झोप लागली काही समजलच नाही... कुणीतरी चेहरयाला स्पर्ष केल्यासारख झाल म्हणून डोळे उघडले... "उठ वेडया, झोपलायस काय... तो आलाय" असा निरोप द्यायला पाण्याचा एक थेंब माझ्या चेहर्यावर विसावला होता... खीडकीबाहेर पाहिल तर धगाळलेल वातावरण... हात बाहेर काढले आणि पुन्हा एकदा तो जादुगार भेटीला आल्याच जाणवल.... पहिला पाऊस आला होता.... पुन्हा एकदा.... पहिल काहीतरी.... :) "पहिल" ह्या शब्दात कमालीच वेडेपण लपलेल असत.. सगळ पहिल अनमोल असत. पहिल्यांदा उच्चारलेला 'आई' हा शब्द.. शाळॆतला पहिला दिवस.. पहिल बक्षिस.. बाबांच्या हातात ठेवलेला पहिला पगार..... पहिल प्रेम.. प्रेमातला पहिला स्पर्ष... सगळ सगळ अप्रतिम.. कोट्यावधी रुपयानी सुधा विकत मिळणार नाही अशी आठवनींची अजब संपत्ती.. पण ह्या सोन्याच्या नाण्याला सुद्धा दूसरी बाजू आहे.. आणि ती म्हणजे हे सगळ आयुष्यात एकदाच अनुभवता येत.. तो क्षण गेला की त्याच्या पाउलखुणा फक्त आठवनींच्या रुपात उरतात... बाकी काहीच उरत नाही... पण एकमेव "पहिल" काहीतरी आहे जे दरवर्षी अनुभवता येत.... आणि प्रत्येक वेळी तितकाच प्रभाव पाडून जात... तो म्हणजे "पहिला पाऊस"....
कानात "कधी तू.. कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात " वाजत होत.. आणि बाहेर पहिला पाऊस.. मला एक सांगा.. इतकी भन्नाट संध्याकाळ असताना आयुष्याच अस्तित्व असण्याच्या दुसरया कुठल्या पावतीची गरज आहे का.. :) परवा पुन्हा तो चमत्कार अनुभवला मी.. कधी एकदा बस मधून बाहेर पडीन अस झाल होत... जस माझ घर जवळ आल तस माझ्या जवळच्या 'मला माझ्या पासून दूर ठेवणारया' वस्तुंची चिंता मला सतावु लागली.. आता त्या "वस्तु" म्हणजे पाकिट, मोबाईल.... पण मनात आल हे सगळ गेल तर परत मिळवता येईल.. पण ह्या वर्षीचा पहिला पाऊस परत नाही येणार.. ते सगळ गुंडाळल रुमालात..
बस थांबली.. मी डोळे मिटूनच बाहेर आलो.. कारण मला माहित होत.. I was going to feel something which I would remember throughout my life.. आणि असे क्षण डोळे मिटूनच अनुभवायचे असतात...
खाली उतरलो.. आणि एखाद्या अफाट सौन्दर्यवतीने आपल्याकड़े हसत एक अप्रतिम नजर टाकावी इतक्या भन्नाट आवेशात तो पाऊस कोसळत होता.. गेल्या वर्षात आलेल अपयश, सतावनारया चिंता, उत्तर नसलेली मानवनिर्मित गणितं... सगळ सगळ भीजताना वाहून गेल.. रस्त्यावरून दिसेल ते वाहत घेवून जाणारया पाण्याने पुन्हा एकदा लढायची जिद्द शिकवली.. मी रुमालात गुंडाळलेल्या निर्जीव वस्तुंसारख्या वस्तु सांभाळत आडोश्याला तोंड वाकड करून उभारलेली मानस बघून थोड हसू आल.. वाटल.. देव पण डोक्याला हात लावून बसला असेल की ह्याना अजुन काय देवू म्हणून.. मी फ़क्त वर पाहून त्याला अनुभवत होतो.. अशा वेळी मनात salary appraisal, traffic problem, EMI, home loan असल काही नाही येत.. मनात असते ती फ़क्त त्या विधात्याच्या असण्याची जाणीव..
यश अपयश कृत्रिम संकल्पना आहेत.. आयुष्य हे फ़क्त आणि फ़क्त क्षणात लपलय.. म्हणुनच खुप जुना मित्र आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटल्यावर मीठी मारताना जे पाणी डोळ्यात येत ते महिन्याच्या शेवटच्या दिवशी salary deposit चा sms वाचून नाही येत.. दर वर्षीचा पाऊस अस काहीतरी अनमोल देवून जातो.. यंदाचाही पहिला पाऊस मला नको असलेल सगळ घेवून गेला.. आणि देवून गेला एक नवी उमेद !!!
Simply beautiful :) I also imagined it sitting at my work station .. I am your fan Onkar :)
ReplyDeleteKeep it up :)
very nice & very true :)
ReplyDeletenaad baad bhava
ReplyDeleteNaad khulach bhava...
ReplyDeleteMast mast mast...ajun kuthalya shabdat lihu...ha tuza chhand asach bahardar n tu lihilya pramane pratyek veli kahitari Pahil asach asava hich sadichha mitra...
very nicely drafted..
ReplyDeleteyou write quite well. Do share if you have more :)
Keep it coming :)
ekdum kadak ....keep posting...
ReplyDeleteSahich ...
ReplyDeleteOnkar, tu kharach lihitos ka? :) Apratim...
ReplyDelete