शनिवारची सकाळ... गरमागरम नाश्ता आणि चहा हादडून झाला होता.. पेपर सुद्धा वाचून झाला... रूममध्ये निवांत एकटाच "काय कराव बर" असा विचार करत पडलो होतो.. आठवल.. कपडे धुवायचे आहेत.. पण काही आठवलच नाही अस समजुन मी "काय कराव बर" हा विचार continue केला. अनेक वर्ष घराबाहेर राहून मी नाक मुरडत का असेना पण फ्लॉवरची भाजी सुद्धा खायला शिकलो पण कपडे धुवायचा कंटाळा मात्र शाबूत आहे. मग आठवल.. तीन चार दिवसांपूर्वी बिल्डरचा फोन आला होता... "साहेब, installment चा चेक तेवढा आणून दया हो" अस म्हणाला होता.. "हिशेब करुन weekend ला भेटायला येतो" अस सांगुन मी त्याला टोलवला होता... माझ्या flat चा बिल्डर आणि मी loan घेतलेली bank हे दोघेही मला कितीही जरी लुबाडत असेलना तरी त्यांची मला साहेब म्हणून हाक मारण्याची अदा मला फार आवडते.. :) मला एक समजलय.. जो सर्व पोलिसाना साहेब म्हणून हाक मारतो आणि ज्याला सगळे चोर साहेब म्हणून हाक मारतात तो म्हणजे आपल्या देशाताला common man ... accidently तेव्हा माझ्याजवळ माझा handset आणि laptop नव्हते... म्हणून थोड नाईलाजानेच जवळ पडलेला पेन पेपर उचलला आणि हिशेबाच गणित मांडल....
सात त्रिक एकवीस... एकवीसातला एक हातच्याला आले दोन.. बे त्रिक सहा आधिक दोन आठ... गणित सोडवता सोडवता मला कसतरी झाल.. हे शब्द कुठे लपले होते.. वारुळातुन एका मुंगी पाठोपाठ अनेक मुंग्यांची रांग बाहेर पडावी तसे ते बाहेर पडत होते.. शाळॆत असताना जे रोज म्हणायचो ते ह्या आधुनिक जगाच्या automated calclulations च्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलोय आपण अस जाणवल मला... गणित हा माझा फार आवडीचा विषय.. त्याच उलगडत जाण मला फार आवडत... तस पाहायला गेल तर गणिताच आणि आपल खुपच जवळच नातं...गणित हा एकमेव विषय आहे ज्याचा स्वभाव आणि आपल्या आयुष्याच्या philosophy चा स्वभाव खुप मिळताजुळता आहे... अनेकदा बोलताना सुद्धा आपण "सगळ गणितच चुकल यार" किंवा "गणितं कशी सुटत गेली समजलच नाही नई" अस अनेकदा बोलून जातो... थोड़ा deep मध्ये जावून विचार केला तर आपल्याला आयुष्यात भेटलेली माणस, त्यांचे स्वभाव किंवा आयुष्यात आलेले अनुभव हे सगळ गणितांसारख वाटत....
जस की... काही गणित आपल्याला हक्काची वाटतात .. ती सुटणार म्हणजे सुटणार.. हे आपले marks fix आहेत ह्याचा आपल्याला अफाट आत्मविश्वास.. पेपरला जायच्या आधी त्यांचा अभ्यास केला काय आणि नाही काय पण ती आपल्याला कधीच धोका देणार नाहीत ह्याची खात्री असते... आणि बरयाचादा ती सुटतात सुद्धा.. पण कधी कधी चुक होते त्याना गृहित धरण्याची... ऐन वेळी अनुत्तरीत राहून कायमचा धडा शिकवून जातात... काही गणित सोडवायला खुप अवघड... आपण option ला ठेवलेली... बघू तरी try मारून म्हणून आपण पराभवाची पूर्ण खात्री असताना सुद्धा सोडवायला जातो आणि ती नकळत सुटतात... "miracle happens" म्हणत हसत हसत marks देवून जातात...
पण मला आज पर्यंत सगळ्यात जास्त विचार करायला लावलय ते म्हणजे मांडायला चुकलेल्या गणितानी.. गणिताचा थोडासा विचित्र प्रकार.. पाहता क्षणी challenging वाटतात ही गणित म्हणून आपण सोडवायला घेतो... प्रत्येक पायरी नंतर उत्तरा जवळ पोहोचल्याचा भास्.. पण फ़क्त भासच... मग चुकल्याची जाणीव.. खाडाखोड.. पुन्हा नव्याने मांडणी.. पुन्हा खाडाखोड... नक्की काय चुकतय समजतच नाही.. प्रमेय... सिद्धांत.. गणिताचे नियम.. सगळ सगळ बरोबर अभ्यास करुन प्रत्येक पायरी जपून पुढे जातोय पण उत्तर का मिळत नाहीये.. पांढरयाशुभ्र आयुष्याच्या पेपर मध्ये एका गणिताची खाडाखोड़ फार त्रासदायक वाटू लागते... द्वंद्व.. चक्रव्यूह.. जितके हे शब्द अवघड तितकीच ती परिस्थितीसुद्धा... मग येते निडरता.. परिस्थीतीविरुद्धची बंडखोरी... साला फेल झालो तरी बेहत्तर पण हे गणित परत सोडवायला घेणार नाही.. अस म्हणून आपण ते अर्धवटच सोडून देतो.. त्यानंतर पिक्चर मध्ये येतो सगळ्या जखमांच्या औषधांचा बाप.. काळ... कालांतराने आपल्याला समजुन चुकत की त्या गणिताची मांडणीच चुकली होती.. त्याच्या नशीबी उत्तर नव्हतच.. "माझी वेळच वाईट होती" म्हणून आपण सगळा दोष काळावर टाकतो.. काळ सुद्धा ते गणित फ़क्त attempt केल म्हणून आपल्याला शहाणपणाच्या रुपात पैकीच्या पैकी मार्क देतो.. आपण शहाणे होतो.. :) अनुत्तरीत राहूनसुद्धा बरच काही देवून जातात... मांडायला चुकलेली गणितं....
ह्या गणितांच्या लाटांमध्ये बिल्डरच्या हिशेबाच वाळुच घर कधी वाहून गेल समजलच नाही.. आता येईल परत त्या चोराचा फोन आणि विचारेल.. "साहेब, हिशेबाच गणित सुटल का हो?"
awesome!!
ReplyDeleteNice :)
ReplyDeleteAs usual.. Ekkkkkkkkkk numberrrrrrrrrrrr....!!
ReplyDelete