"हे वर्ष कधी सरल काही समजलच नाही नई".... दर वर्षीच्या डिसेंबरमध्ये हमखास कानावर पडणार हे वाक्य.. तस पहायला गेल तर काळ ना कुणासाठी धावलाय ना थांबलाय. तरीपण आपल्याला मनात कुठेतरी अस वाटत असत की सगळ खुप लवकर घडून गेल.. हे वाक्य बोलल की आपण ह्या वर्षी खुपच busy होतो अस भासवता येत म्हणून मी पण shining मारायला हां dilogue मारतो बरयाचदा.. दिवाऴी जवळ आली की सगळीकड़े साफ़सफाईची गड़बड़ सुरु होते... सगळ आवरत असताना जून-पुराण बरच काही सापडत जात... कधीतरी जपून ठेवलेल.. नकळत हरवलेल.. बरच शोधूनही न सापडलेल... तर काही जुन्या आठवणीनी झालेली ओल साठवून ठेवलेल.. उलगडत जातो मग आठवणींचा खजिना....म्हंटल चला.. आपण पण ह्या वर्षीचा शेवट आलाय म्हणून मनाची साफ़ सफाई करायला घेवु.. काहीतरी अनमोल नक्कीच सापडेल.. बघुतरी try मारून.. बसलो एकटाच विचार करत... आठवत गेले मन अनेक क्षण... लपलेले.. माझ्या हाकेची वाट पाहणारे..बाबानी पाठवलेला "तिळगुळ घे गोड बोल" चा SMS... कॉलेज मध्ये असताना चहापासून ते exam फी पर्यंतचा हिशेब लिहून ठेवलेली रूम आवरताना सापडलेली एक diary.... ऑफिसच्या pantry मध्ये cream ची biscuits पाहून उगाचच झालेला आनंद..... तळहातावर पडलेला पहिल्या पावसाचा थेंब.... पाकिस्तानला चारीमुंडया चित केल्यावर बेभान होवून मित्राना मीठी मारत केलेला जल्लोष..... वर्ल्ड कप जिंकल्यावर सचिन ला pavilion मधून बाहेर पळत येताना पाहून नकळत डोळ्यात साठलेले आनंदाश्रु... माझ्या मित्राच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला हातात घेताना अंगावर आलेले शहारे.... b'day ला आलेला एक अनपेक्षीत फोन.... मित्राने surprisingly दिलेल एक मस्त greeting कार्ड... रात्री भर पावसात बंद पडल्यावर सहा किलोमीटर ढकललेली अन सकाळी काहीही न करता आपोआप start झालेली माझी sweatheart पल्सर.... बरयाच वर्षानंतर पायाला झालेली एक जखम... पूर्ण आकाराला आलेल्या माझ्या पुण्यातल्या घरात ठेवलेल पहिल पाउल.... सकाळच्या थंडीत निवांत उन्हात बसलेल आणि ओळख नसतानाही फुकटात माझ्याकडून कुरवाळून घेणार एक गुबगुबीत मांजर.... "निसर्ग" मध्ये पोटात जाता जाता हृदयाला स्पर्श करून गेलेली prawns बिरयानी.... फुटपाथवर पेपर वाचत मोठमोठ्याने हसणारा एक वेडा भिकारी आणि पेट्रोल पाच रुपयानी महाग झाले म्हणून वैतागलेल्या अवस्थेत 'नक्की सुखी कोण' अशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहणारा मी... annual bash मध्ये "कोल्लावरी" आणि "साड्डा हक्क एथ्थे रख" वर केलेला धिंगाना डान्स (?).........
हे सगळ आठवताना ह्या वर्षी माझ्या आयुष्यात घडलेला एक फार मजेशीर किस्सा आठवला.. खरतर फालतू आहे पण आता आठवलाय तर लिहिन माझ कर्तव्य आहे.. :) माझ्याकडे खुप जून्या स्टाइल चा handset होता.... त्याच्याकड़े पाहून काही "जण" हसत होते तोपर्यंत मला काही नाही वाटल... पण जेव्हा काही "जणी" हसल्या तेव्हा मात्र दिल का दर्द सारख काहीतरी झाल.. जळत्या मेनबत्तीवर हात धरून मी त्या काहीजनींच challenge स्वीकारल आणि नविन handset विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला...."basic functionalities with good look and feel" पासून सुरु झालेला प्रवास "touch screen with 3G" ला जावून पोहोचला आणि मला नऊ हजाराचा चटका बसला.. नविन handset विकत घेतल्या पासून एक विचित्र घटना घडायला लागली... ऑफिस मध्ये एकदा एक मस्त ringtone ऐकू आली मला.. दिल चाहता है हां माझा लय लय लय आवडीचा पिक्चर.. का ते विचारू नका कारण काही भावनांच्या नशीबी शब्द नसतात.. त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आमिर खान द्विधा मनस्थितीत विचारात गुंतलेला दाखवलाय.. त्यावेळी जे backgroung music आहे ना ती ringtone..... मला ऐकताक्षनी आवडली.. कुठून ऐकू आली ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण नाही सापडली.. नंतर जणू ती ringtone माझा पाठलागच करत होती.. cafetaria मध्ये.. gym मध्ये...hotel मध्ये.. अशी 7-8 वेळा ती ऐकू आली मला.. पण कुठून ऐकू येतीये ते समजतच नव्हत.. प्रेमातच पडलो मी तिच्या... download करावीशी सुद्धा वाटेना कारण प्रेम येड़ असत... 21 november ला मी ऑफिस मध्ये खुप busy असल्याची acting करत असताना ती पुन्हा ऐकू आली.. मी झपकन मान वळवली आणि finally ती मला सापडली.... आज ती माझ्या आयुष्यात आहे.. माझ्या ऐतिहासिक handset च्या ringtone च्या रुपात... :)
ह्या वर्षीचा शेवट ह्याच वर्षीच्या आठवणीनी गोड केला... बघितलत... हे अस असत आठवनींच.. इतक सगळ कुठे लपल होत देव जाने... पण मज्जा आली एक flashback मारताना.. तुम्ही पण मारून बघा एक try .. मस्त वाटत.. :)
काही जणांची आयुष्यात entry, काहींची नुसतीच धावती भेट.. तर काहीना हसत हसत केलेला गुड बाय... ह्या सगळ्या क्षणांच्या भाऊगर्दीत आयुष्याच्या तराजुचा balance सांभाळता सांभाळता हे वर्ष कधी सरल समजलच नाही राव !!!
wow :)
ReplyDeletetumchi sweatheart and te gubgubit manjar nakkich faaar kahi sangata...
Khup chan! As usual :) :) :)
ReplyDelete