Wednesday, July 13, 2011

प्रिय मुंबईस....


प्रिय मुंबईस,
आज तुला पत्र लिहिताना हात थरथरतोय. डोळ्याच्या कडा पानावल्यात. आत्ताच तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची न्यूज़ TV वर पहिली. पुन्हा एकदा bomb blasts !! निष्पापांचे मृतदेह, बाप गमावून निराधार झालेली अनाथ मूल, तुझ्या रस्त्यावर सांडलेल ते हतबल रक्त पाहून तळपायाची आग मस्तकाला गेली ग.... काही दिवसांपूर्वी आमच्या पुण्याला झालेल्या जखमेची आठवण पुन्हा ताजी झाली. किती उपकार आहेत ग तुझे आमच्यावर हे शब्दात मांड़ण केवळ अशक्य.. आर्थिक राजधानीचा थाट तुझा... कित्येक बेरोजगाराना मायेची भाकरी दिलीस तू.. कित्येक बेघराना आधार दिलास.. तुझी गती पाहून आम्ही अवाक होतो.. परदेशातही 'I am from India' अस आम्ही सांगितल्यावर 'ohh India? then are you from Mumbai?' ह्या प्रतिप्रश्नावर मुंबईकर नसूनही आमची छाती तुझ नाव ऐकून अभिमानाने फुगते.. सारख इश्वर चरनी प्रार्थना करतो की हिला कुणाची नजर लागू नये.. पण नेमक हेच घडत.. जे आज घडल ते... पुन्हा एकदा तुझा बलात्कार झाला..
कधी संपणार हे सगळ हा भ्याड प्रश्न एकमेकाना विचारून चादरी डोक्यावर घेवून आज आम्ही झोपी जावू... पाउस तसा चालूच आहे तेव्हा तुझ्या रस्त्यावर सांडलेल रक्त पुन्हा एकदा काही क्षणात वाहून जाईल... आता नाही सहन होत ग हे सगळ.. बंदुका हातात घेवून तुझ्या अपराध्यांच्या डोक्यात गोळ्या घालाव्याश्या वाटतात पण अपराधी तरी कोण ग.. आम्हीच.. होय आम्हीच... स्वराज्यासाठी ज्या भूमीवर शिवरायानी शत्रुचा कोतळा बाहेर काढला त्याच भूमीवर आम्ही स्वाभिमान आमच्याच छातीत कुजवत ठेवत जगतोय... नुसत एकमेकाना दोषी ठरवून षंढत्वाच जीवन जगतोय.. खर तर आमच्यापेक्षा ते षंढ सुद्धा बरे.. निदान टाळ्या वाजवून स्वताहाच पोट तरी भरत आहेत.. आम्ही मात्र पदोपदी तुझा बलात्कार निष्क्रियतेने पाहतोय.. मेनबत्त्या पेटवून मेलेल्यांना श्रद्धांजली वाहून राजकारन्याना शिव्या देतोय.. पण हे भड़वे नेते तरी कोण ग.. आमच्याच निष्क्रिय तेचे, आमच्याच भ्याडपनाचे निर्जीव पुतळॆ.. स्त्रीच्या अब्रुच्या रक्षनासाठी छातीची ढाल बनवनारी ती मर्दांची जात कुठे हरवली माहीत नाही ग.. ज्या भूमी मध्ये अखंड महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने रक्ताचे पाट वाहिले त्याच भुमीमध्ये काही दिड दमडीचे हिजड़े निश्पापाना मारत आहेत आणि आम्ही काय करतोय?? तर निषेध नोंदवतोय.... तुझ्या चरणी हा माथा टेकवून तुझी माफी मागतो आज.. शक्य असेल तर माफ़ कर आम्हाला.. आम्हीच तुझे अपराधी आहोत.. माफ़ कर माते, आम्हाला माफ़ कर !!!



- तुझा अपराधी

8 comments:

  1. Onkar, Khupach Chan .... Atta paryant khup patra vachali asa kalavalin , asahayata kabul karun mafi maganar patra navat vachal. He Patra jastit jast lokana pathav , Mumbai badal ashyach bhavana asane pan kahi n karu shaknar khup lok ahet .

    ReplyDelete
  2. आपण सगळ्या झालेल्या गोष्टी tv वर पहिल्या, आपले मित्र मैत्रिणी नातलग ठीक आहेत का, हे फोन message करून तपासले, आणि आज आपण पुन्हा आपल्या आपल्या कामाला आलोय .... किती भयंकर आहे ना सगळे ... कधी संपणार हे, आणि आपण की करू शकतो या साठी ....

    ReplyDelete
  3. at least now they should hang Kasab..

    ReplyDelete
  4. Very true !! Nice blog Onkar! Sensible one!

    ReplyDelete
  5. आपल्या देशात दहशतवादी हल्ल्यात मेलेल्या माणसाच्या घरच्यांना एक लाख मिळतात, जो सैनिक शहीद होतो त्याच्या विधवेला सरकारसमोर याचना करावी लागते तिच्या हक्काच्या निधीसाठी आणि ज्याने हा दहशतवाद केला आहे (चि. कसाब) त्या माणसाला जावयासारखा सांभाळून करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. कोणाला दोष देणार आपण? बाहेरून येणाऱ्या दहशतवाद्याला कि घरातल्या भ्रष्ट राजकारण्यांना?
    असो, ओंकार खूप छान लिहिला आहेस!

    ReplyDelete
  6. Well said, its only we who suppose to do something to save our mother. Politicians are there just to fill there pocket and nothing to do with social work or country. Really lets gather and thing way out. If someone has plan lets share. I guess India needs Bhagat Singh and Jhashi Rani now.

    ReplyDelete
  7. खूप छान ओंकार. भारताला देशोधडीला लावणाऱ्या नेत्यांचा धिक्कार असो.
    यांच्या छाताडात असलेलं काळीज दगडापेक्षा कठीण आहे रे ... एक वेळ दगड लाजेल आणि त्याला पाझर फुटेल पण या निर्लज्ज माणसांना काही होणार नाही.

    ReplyDelete