29 नोव्हेंबर 2003.... Engineering चं second year चालू होत माझं. पहाटेच झोपलो होतो revision करून. त्या दिवशी मी mentally प्रचंड टेंशन मध्ये होतो....In fact, इंजिनीरिंग च्या exam चे दिवस वेगळेच असायचे पण तो दिवस विशेष खास होता.. मी त्या दिवशी Applied Mechanics चा second attempt देण्यासाठी जात होतो... ज्यांनी कुणी इंजिनीरिंग केले त्यांना ह्या first year च्या subject बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही... सर्वात भयानक विषय... त्यात पहिल्या attempt ला मी fail झालो होतो...
सकाळी उठून तयार झालो, बाप्पा च्या मंदिरात एक नेहमीप्रमाणे Mechanics च पुस्तक सोबत घेऊन फेरी मारली. इंजिनीरिंग ला प्रत्येकाची देवाला वशिला लावायची एक unique पद्धत असायची. माझी ही होती... . ज्या विषयाचा पेपर त्या विषयाचं book सोबत घेऊन जायचं, "सोडवं" असं सांगायला. अंधश्रद्धा तर international level च्या असायच्या... पटणार नाही, पण इंजिनीरिंगचे चार वर्षाचे सगळे पेपर्स मी same लाल रंगाचा शर्ट घालून लिहिलेत.. (नाक मुरडू नका,regularly धुवायचो मी तो शर्ट)...
PMT ने कॉलेजला निघालो. तेव्हा PMT मध्ये रेडिओ लावायचे स्पीकरवर... त्यावर गाणं लागलं होत.. "अल्लाह के बंदे हंसदे , जो भी हो कल फिर आयेगा"... गाणं तसं motivational होतं पण मला धस्स झालं... "कल फिर आयेगा" म्हणजे? हा देवाचा सिग्नल आहे कि काय subject बद्दल...
Exam हॉल मध्ये पोहोचलो.. मनातली धाकधूक चालूच होती.. हा पेपर ह्या attempt ला नाही सुटला तर critical attempt ला जाणार होता.. critical म्हणजे असा attempt ज्यात जर का पेपर सुटला नाही तर एक वर्ष घरी बसायचं.. आणि जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत इंजिनीरिंग continue नाही करता येत... पेपर हातात आला, मी थरथरतच घेतला... उघडून एक नजर फिरवली आणि थोडा वेळ डोकं सुन्न झालं... खूप tough पेपर काढला होता university ने.. तेव्हा पेपर वर एक नजर टाकल्यावर समजायचं university च्या मनात काय आहे ते... हात पाय गळाले होते माझे... लोकांच्या अपेक्षा, माझी स्वप्न, आई वडिलांची मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक... bla bla bla... सगळ्याची भेळ झाली होती मेंदूत... पेपर critical ला गेल्यात जमा होता... काहीही सुचायचं पूर्णपणे बंद झालं होतं.... सगळा धीर एकवटून, एक मोठा श्वास घेऊन जेवढं जमेल तेवढं तीन तास डोकं लावलं...
बाकीचे पेपर्स चांगले गेले पण हा backlog चांगलाच जड जाणार हे समजलं होत... exam संपली.. मी घरी आलो माझ्या गावी... मी शक्यतो गावात मंदिरात जात नाही... विश्वास नाही असं काही नाही पण मी जास्त धार्मिक नाही... पण तेव्हा गावी आल्यावर मंदिराच्या बऱ्याच चक्करा मारून झाल्या होत्या... Result चा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा मी जास्त अस्वस्थ होत होतो... Critical ला पेपर गेला तर काय??? एक दिवशी सकाळी माझा मित्र सुहास चा फोन आता.. "ओंक्या, आज result आहे, सांगतो तुला तुझा result संध्याकाळ पर्यंत"... तेव्हा इंजिनीरिंग ला result च्या दिवसाच्या खूप अफवा पसरायच्या.. actual result च्या आधी जवळपास ८-१० दिवस रोज अफवा असायची कि result आजच आहे.. त्यामुळे सुहासला मी फक्त "बरं" म्हणालो आणि विचार केला हि त्या ८-१० अफवांमधली पहिली अफवा असेल... रात्री जेवत होतो इतक्यात landline फोन वाजला.. (होय, मी त्या जमान्यात इंजिनीरिंग केलीये)... आईने फोन उचलला.. एव्हाना तिला समजलं होत माझं टेंशन.. मला म्हणाली, सुहासचा फोन आहे.. उचललेला घास परत ताटात ठेवला.. फोन घेतला.. "ओंक्या, Second year first semester ऑल क्लिअर झालास तू"... मी काहीही बोललो नाही..फक्त एक प्रश्न विचारला.... "Mechanics?"... सुहास म्हणाला... "सुटला लेका"... त्या दोन शब्दांनी माझं आयुष्य बदलल्यासारखं हलकं फुलकं केलं होत मला... नाचायचा बाकी होतो... डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. (आता सुद्धा आहेत)...
मी पेपर सोडवला पण त्या पेपरने मला अजूनही सोडलं नाही... तो पेपर मी अजूनही जपून ठेवलाय... (वर फोटो मध्ये आहे तो).. मी Computer engineering ला होतो.. Applied Mechanics चा आणि माझ्या stream चा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता... इंजिनीरिंगला जे शिकवतात त्याचा आयुष्यात किती उपयोग होतो हा तसा चर्चेचा विषय आहे.. पण एक मात्र नक्की, इंजिनीरिंगच्या अनुभवांनी आयुष्याचा पॅटर्न समजून घ्यायला खूप मदत केली.. त्या अनेक अनुभवांपैकी Applied Mechanics चा पेपर हा माझा सगळ्यात favorite...
अपघाताने का असेना, त्या दिवशी एक मोठा श्वास घेऊन मी ते क्षण, ते तीन तास जाऊ दिले..जेवढं जमेल तेवढं लिहिलं आणि somehow पेपर सुटला... पेपर सोडवणारा कोण??.. त्या मंदिरातला गणपती बाप्पा , नियती, काळ, माझं नशीब किंवा आणि कोणी.. ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही.. पण एक पॅटर्न शिकलो.... मोठा श्वास घेऊन वेळ जाऊ देणे हेच उत्तर असतं आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नांचं..

No comments:
Post a Comment